मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील याचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुजय यांच्या भाजपमधील प्रवेशाचं शिवसेनेने स्वागत केलं आहे. विखे पाटील यांची नवी पिढी भाजपसोबत जातेय ही चांगली गोष्ट आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेसोबत यावं अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान यापूर्वी बाळासाहेब व राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेस सोडली होती. ते राजकारणात इतकं वर्षे असतानाही मंत्रिपद मिळालं नव्हतं, तेव्हा शिवसेनेने ते दिलं होतं. तिसरी पिढी भाजपसोबत जातेय, चांगली गोष्ट आहे. यामागे काय तडजोड झाली माहित नाही. सेना भाजप युतीवेळी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांनी आता तपासवं. घर सांभाळू शकत नाहीत त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो, उद्धव ठाकरेंवर टीका करताना भान ठेवायला हवं होतं. भविष्यात काय वाढून ठेवलंय ते बघायला हवं होतं. त्यांना आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS