मुंबई – ठाकरे चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन आता वाद निर्माण झाला असल्याचं दिसत आहे. २५ जानेवारीला फक्त ठाकरे चित्रपटच प्रदर्शित होणार, अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असा इशारा चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे. याबाबत चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, ठाकरे चित्रपट हा अनेकांसाठी भावनिक विषय आहे. ते शिवसैनिकांचे वैयक्तिक मत असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. यानंतर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी ‘ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत असून या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही असं म्हटलं आहे.त्यामुळे यावरुन आता वाद निर्माण झाला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS