मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर गेले असल्याची माहिती आहे. संजय राऊत आणि शरद पवार भेटीत राजकीय चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर शरद पवार आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय परिस्थितीविषयी मी लवकरच बोलणार आहे. मी संजय राऊत यांची वाट बघत होतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीविषयी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याची पवारांची भूमिका स्पष्ट आहे. मी पवारसाहेबांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची भूमिका कायम आहे विरोधी पक्षात काम करायचे असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS