मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उद्या मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. ‘मातोश्री’वर येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची परंपरा आहे. त्यानुसार अमित शाह यांचं स्वागत होणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. आम्ही साधी माणसं आहोत आमचे पाय जमीनीवर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शाह एका सत्ताधारी राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहे. त्यांनी भेटीची वेळ मागितली होती, त्यानुसार त्यांना ती देण्यात आली असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भेटीसंदर्भात आमचा अजेंडा नाही. त्यांच्या अजेंड्याबाबत काही कल्पना नाही. आमचा अजेंडा उद्धव ठाकरेंनी जाहीर केला असल्याचंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच शाह यांनी स्वबळावर 350 जागा जिंकण्याचा घोषणा केलीय. कदाचित त्यांना स्वबळाची आता खात्री वाटत नसावी. म्हणून ते नवे मित्र शोधत आहेत. 2019 स्वबळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री निवडून आणणे हा आमचा अजेंडा असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच अमित शाह यांच्याप्रमाणे देशभरातील 9 राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली आहे. आम्ही कुणाचे विरोधी नाही, आमचा स्वतंत्र अजेंडा आहे. तसेच मातोश्रीवर उद्या चहापान होईल. चांगला पाहुणचार ही मातोश्रीची परंपरा आहे. जावेद मियाँदादही आले होते मातोश्रीवर त्यांचाही चांगला पाहुणचार केला होता असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच माणसांनी एकमेकांकडे येत-जात राहावं किलमिषे दूर होतात आसही संजय राऊत यांनी म्हटलं असून पालघर मर्दासारखे लढलो, नैतिक दृष्ट्या विजय आमचाच झालाय. आमच्याइतकं प्रखर हिंदुत्व देशात कोणाकडेही नाही. मतांसाठी रोजा इफ्तार पार्ट्या द्यायला सुरुवात केलेली नाही. मतांसाठी किती स्तरावरील लाचारी करावी याचं मोजमाप असतं. लोकभावनेने विरोधातील गोष्टी आम्ही करीत नाही. येनकेन प्रकारे सत्ता हवीच यासाठी आम्ही गुडघे टेकणार नाही, हा बाळासाहेबांचा मंत्र अमर राहणार असल्याचंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS