रत्नागिरी – परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संजय राऊत यांचं निलंबन केल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एसटी बसचे चालक संजय राऊत यांच्यावर रावते यांनी ही कारवाई केली आहे. संजय राऊत हे देवगड बोरिवली एसटी बस चालवताना फोनवर बोलत असल्याचं आढळून आलं होतं. याबाबतची बातमी माध्यमांनी देताच कठोर कारवाई करत रावते यांनी संजय राऊत यांचं निलंबन केलं आहे.
दरम्यान संजय राऊत या चालकाचे तीन महिन्यांसाठी एसटी सेवेतून निलंबन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करणाऱ्या चालकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. यामध्ये आर्थिक दंड, पगारवाढ स्थगिती तसेच निलंबनाच्या कारवाईचा समावेश असतो. मात्र इतर चालकांना देखील शिस्तीचा धाक बसावा यासाठी पहिल्यांदाच या चालकावर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
COMMENTS