मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा केला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना त्यांचाच व्हिडीओ दाखवत फॉर्म्युलाची आठवण करुन दिली आहे. या व्हिडीओमध्ये ‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा, डिक्शनरीमधील व्याख्या अजून बदललेल्या नाहीत. असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. राजकारणात मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आहे की नाही हे आम्ही ठरवू. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात लिहिलं म्हणून 2014 मध्ये सरकार आलं, हे विसरु नका असंही राऊत म्हणाले आहेत.
COMMENTS