मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला असून यामध्ये वाघाच्या हातात कमळ आणि गळ्यात घड्याळ दाखवण्यात आलं आहे. संजय राऊतांनी हाच फोटो ट्विट करत व्यंगचित्रकाराची कमाल…बुरा न मानो दिवाली है असं कॅप्शन दिलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. कोणालाही बहूमत मिळालं नसल्यामुळे सत्तेवर कोण विराजमान होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
व्यंग चित्रकाराची कमाल!
बुरा न मानो दिवाली है.. pic.twitter.com/krj2QAnGmB— Sanjay Raut (@rautsanjay61) October 25, 2019
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटमुळे शिवसेना राष्ट्रवादीसोबत येऊन सत्ता स्थापन करु शकते असा अंदाज आहे. आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकू लागले आहेत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद पाहिजे की मुख्यमंत्रिपद हे त्यांनी ठरवायचं असल्याचं सूचक वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विजय जल्लोषानंतर येवल्यात पत्रकारांशी बोलताना केलं आहे. त्यामुळे सत्तेपासून भाजपला वंचित ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS