अखेर खासदार संजय राऊतांची माघार, ‘ते’ वक्तव्य घेतलं मागे!

अखेर खासदार संजय राऊतांची माघार, ‘ते’ वक्तव्य घेतलं मागे!

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वक्तव्यावरुन माघार घेतली आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी माघार घेतली आहे. इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्याने कोणी दुखावलं गेलं असेल, तर मी वक्तव्य मागे घेतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जेव्हा इंदिरा गांधींविषयी कोणी टीका टिपणी करत असे, तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र गप्प बसायचे, पण मी त्यांची बाजू उचलून धरायचो. परंतु माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहचली, असं कोणाला वाटत असेल, त्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

COMMENTS