मुंबई – फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन मनसे आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पहायला मिळतंय. एकमेकांवर सध्या जोरदार टीका टिप्पणी सुरु असताना शुक्रवारी मध्यरात्री मनसेनं संजय निरुपम यांच्या घराबाहेर वादग्रस्त होर्डिंग्ज लावलंय. यामध्ये जोरदार टीका करत संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असल्याचा उल्लेख मनसेनं केलाय.मनसेच्या या होर्डिंगमुळे काँग्रेस आणि मनसेमधला वाद चांगलाच शिगेला पोहचलाय.
मुंबईतील काँग्रेस मुख्यालयाची तोडफोड करून शुक्रवारी सकाळीच मनसेने निरूपम यांना ‘इट का जवाब पथ्थर से मिलेगा’ असा इशारा दिला होता. त्यानंतर निरूपम यांनी ट्विटरवरून हल्ल्याचा निषेध करत मनसैनिकांना भ्याड, नपूंसक आणि लुख्खे म्हटले होते. वांद्रे येथील काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री शाईफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली. मात्र, हे कृत्य नेमके कुणी केले, याचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांकडून कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मनसेनेही अजून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनसे आणि काँग्रेस यांच्यातील वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. आता मनसेच्या या होर्डिंगला संजय निरुपम हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
COMMENTS