महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांचा गौरव !

महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांचा गौरव !

नवी दिल्ली – नवव्या संसदरत्न पुरस्काराचं आज चेन्नईमध्ये वितरण करण्यात आलं आहे. या पुरस्कारानं एकूण सात खासदारांना गौरवण्यात आलं आहे. त्यापैकी पाच खासदार हे महाराष्ट्रातील असून तर बीजेडीच्या ओदिशामधील एका खासदारालाही हा पुरस्कार दिला आहे. प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सल्ल्यानुसार या फाऊंडेशनने हे संसदरत्न पुरस्कार सुरु केले होते.

महाराष्ट्रातील या खासदारांचा गौरव

 सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार

राजीव सातव – काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार

श्रीरंग बारणे – शिवसेनेचे मावळचे खासदार

धनंजय महाडिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार

हिना गावित – भाजपच्या नंदुरबारच्या खासदार

दरम्यान या खासदारांची हजेरी, चर्चांमधला सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं इत्यादी माहितीच्या आधारे या खासदारांची पुरस्कारासाठी निवड केली जाते.

खासदारांची कामगिरी

सुप्रिया सुळे : 74 चर्चांमध्ये सहभाग, 16 खासगी विधेयकं, 983 प्रश्न उपस्थित आणि 98 टक्के उपस्थिती.

श्रीरंग बारणे : 102 चर्चांमध्ये सहभाग, 16 खासगी विधेयकं, 932 प्रश्न उपस्थित आणि 94 टक्के हजेरी.

धनंजय महाडिक : 40 चर्चांमध्ये सहभाग, एक खासगी विधेयक, 970 प्रश्न आणि 74 टक्के हजेरी.

हिना गावित : 151 चर्चांमध्ये सहभाग, 21 खासगी विधेयकं, 461 प्रश्न आणि 82 टक्के हजेरी.

राजीव सातव : 97 चर्चांमध्ये सहभाग, 15 खासगी विधेयकं, 919 प्रश्न उपस्थित आणि 81 टक्के हजेरी.

 

COMMENTS