मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये जाहीर केले आहेत. सध्याची राज्याची परिस्थिची बिकट असली, तरी जिथं पैसा द्यायचा आहे, तिथं तो द्यावा लागतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या घोषणेनंतर सारथी संस्थेची स्वायत्तता राखणं गरजेचं आहे. आज सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये दिले ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे.
दरम्यान मराठा समाजानं गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित दादांनी दालनात बैठक घेतली. या संस्थेची स्वाययत्ता कायम राहिली पाहिजे. सारथी टिकवायची आहे, स्वायत्तता टिकवायची आहे, पवार साहेबांनी निर्णय घेतलेत, कुणी गोंधळ आणि गैरसमज करुन घेऊ नये, पूर्वीच्या सचिवांनी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढली, पवारांनी शब्द दिलाय, सारथीची स्वायत्तता टिकेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच सारथी ही शाहू महाराजांच्या नावाने सुरु असलेली संस्था, ती बंद होणार नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम आणि सारथीचं काम आता एकाच छताखाली सुरु होईल असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.
COMMENTS