सातारा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताय्रात काँग्रेसला धक्का बसला असून माजी आमदारानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे
साताऱ्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असल्याचं दिसत आहे. मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्ता असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यीन मदन भोसले काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र आहेत. आज भुईंज येथे डिस्टलरी प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मदन भोसले हे आताचे हे भावी आमदार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
COMMENTS