सातारा – साता-यात धक्कादायक घटना घडली असून एका ज्वेलर्स व्यावसायिकानं जीएसटी आणि नोटबंदीला कंटाळून आत्महत्या केली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील ज्वेलर्स व्यावसायिक राहुल फाळके यांना नोटबंदी आणि जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला असून आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे राहुल यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून ही पोस्ट सद्या व्हायरल होत आहे.
सर्वाना माझा शेवटचा नमस्कार ???????? जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली …. तेव्हा पासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा…
Posted by राहूल फाळके on 15 मार्च 2018
दरम्यान राहुल यांनी फेसबूकवर पोस्ट टाकली असून नोटांबदी, जीएसटीला कंटाळून आपण जीवन संपवत असंल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जेव्हापासून नोट बंदी झाली तेव्हापासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी की काय म्हणून GST लागू केला. त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. आधीच आमचा व्यावसाय उधारीशिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत खूप पैसे अडकले असून लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली. खूप जणांना अडचणीतून बाहेर काढले. परंतु आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला, त्यामुळे आपण आर्थिक संकटात सापडलो असल्याचं राहुळ फाळके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राहुल यांनी केलेल्या आत्महत्यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अनेकांकडून सरकारवर जोरदार टीकाही केली जात आहे.
COMMENTS