सातारा – आज जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी मान खटाव परिसरातील गोपूज शिवारातल्या शेतात बसून वनभोजन केलं. अगदी साध्या पद्धतीत या नेत्यांनी सतरंजीवर बसून ठेचा-भाकरी खाल्ली तसेच यावेळी काँग्रेसच्या नेत्यांन शेतक-यांशी संवादही साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान यावेळी शेतक-यांनी काँग्रेसच्या नेत्यांपुढे समस्या मांडल्या. डोक्यावर कर्जाचा बोजा, दोन वर्षांपासून पाऊस कमी असल्यामुळे शेतात कमी उत्पन्न मिळत असल्याची खंतही यावेळी शेतक-यांनी व्यक्त केली.
COMMENTS