उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी आघाडीकडून ‘हा’ नेता मैदानात?

उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी आघाडीकडून ‘हा’ नेता मैदानात?

सातारा – माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आव्हान देण्यासाठी आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरलं जाणार असल्याची माहिती आहे. साताऱ्याच्या मैदानात शरद पवार उतरणार असतील तर आपण माघार घेऊ असं सांगत उदयनराजेंना अश्रू अनावर झाले.होते. तसेच इतरांशी लढायला आपण कधीही तयार असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विधानसभेसोबत होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणूकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. साताय्रात शरद पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उदयनराजेंना कडवं आव्हान निर्माण केलं आहे. कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणाऱ्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला आत्तापर्यंत केवळ तीनचवेळा विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उदयनराजेंना धक्का देण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

COMMENTS