उदयनराजेंविरोधात तृतीय पंथीय लढवणार लोकसभा निवडणूक!

उदयनराजेंविरोधात तृतीय पंथीय लढवणार लोकसभा निवडणूक!

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात
आता तृतीय पंथीयांचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. प्रशांत वारकर हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.प्रस्थापित समाजाने आमचे अस्तित्व कायम नाकारले. हाडामासाची माणसे असूनही केवळ आमच्या नैसर्गिक भावनांचा कौल ऐकूण जगणेही समाजाला नको होते. परंतु आता आमच्या हक्कांसाठी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं प्रशांत वारकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कायद्याने तृतीय पंथीयांना स्वतंत्र नागरिकत्व बहाल केल्यानंतर आता विकासाची धोरणे बनविण्याच्या प्रक्रियेतही आमचा सहभाग असावा असं आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवून तृतीय पंथीयांना न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचं प्रशांत वारकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS