सातारा लोकसभेच्या तिकीटावरुन  गोविंद बागेत खलबतं ?

सातारा लोकसभेच्या तिकीटावरुन गोविंद बागेत खलबतं ?

बारामती – सातारा लोकसभेच्या तिकीटावरुन आज गोविंद बागेत खलबतं सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारचे सध्याचे खासदार उदयनराजेंच्या विरोधात ही खलबतं सुरु असल्याची माहिती आहे. सातारा लोकसभेच्या तिकीटाबाबत आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज गोविंद बागेत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान तिघांनीही उदयनराजेंच्या विरोधातील तक्रारी शरद पवारांच्या कानावर घातल्या असल्याची माहिती आहे. तसेच आगामी निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट देऊ नये अशी मागणी या नेत्यांनी केली असल्याची माहिती आहे. तसेच बैठक संपल्यानंतर पत्रकारांना चकवा देऊन तिन्ही नेते मागच्या दाराने निघून गेले असल्याची माहिती आहे.

दम्यान दोन दिवसांपूर्वीच शरद पवार आणि उदयनराजे यांच्यामध्ये भेट झाली होती. या भेटीत शरद पवार यांनी आपल्याला मिठी मारली असल्याचं वक्तव्य उदयनाराजे यांनी बैठकीनंतर केलं होतं. तसेच फसवासफसवी करुन नका असं वक्तव्य केलं. होतं. त्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत उदयनराजे हे आमच्या पक्षाचे खासदार आहेत. आणि लोकसभा निवडणुकीबाबत या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं होतं.

त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार उदयनराजेंना तिकीट देतात की काय अशी भीती असल्यामुळेच या तिन्ही नेत्यांनी पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीनंतर शरद पवार हे आपला निर्णय बदलून सातारा सोकसभा निवडणुकासाठी उदयनराजेंना तिकीट देणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS