मुंबई – भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत उदयनराजे यांनी ट्वीट केलं असून अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये जाहीर केलं आहे. उदयनराजे यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. तसेच आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
दरम्यानच कालच उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. बैठकीत उदयनराजे यांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं आहे असं बोललं जात होतं. परंतु हा अंदाज अखेर खोटा ठरला असून उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचं ठरवलं आहे.
COMMENTS