दूध दराच्या प्रश्नावरुन सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाकेबंदी सुरू केलीय. राज्यात अनेक ठिकाणी मुंबई पुण्याकडे जाणारे दूध टँकर कार्यकर्त्यांनी रोखले. काही ठिकाणी दूध टँकरची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. तर काही ठिकाणी दूध टँकर जाळण्यात आले. त्यामुळे दूधाची वाहतूक अनेक ठिकणी रोखली गेली.
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित शिवडे गावातील शेतकऱ्यांचा दुध आंदोलनाला संपुर्ण पाठिंबा. दुधाचा एक थेंबही दूध बाहेर नेऊ दिला जाणार नाही असा इशारा शिवडे गावातील नागरिकांनी दिला आहे. शिर्डीत रात्री १२ वाजता दुधाचा अभिषेक घालुन आंदोलनाला सुरवात होणार आहे. आबे दरम्यान संध्याकाळ पासुनच दुध संघ दुध संकलन बंद करण्याच्या तयारीत आहे. नगर जिल्ह्यात दुध बंद आंदोलन व्यापक करण्याचा स्वाभीमानीचा प्रयत्न आहे.
सांगलीत मोठा पाठिंबा
सांगली जिल्ह्यात स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध अंदोलनाला, मिरज पूर्व भागातील 100 दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्र मालक, गवळी, यांनी दिला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या भागातील दूध संकलन बंद ठेवलं जाणार आहे. दरम्यान वारणा दूध संघाचा टँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडला. टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. तसंच टँकरच्या काचा फोडून स्वाभीमानि शेतकरी संघटनेने केले आंदोलन.
राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर गुजरातचे दूध आडवणार
राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनात सक्रीयपणे सहभागी होत असताना गुजरातमधून मुंबईला येणारे दूध अडवण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी, स्वतः पालघर परिसरात हे मुंबईला जाणारे दूध अडवणार आहेत. शेट्टी यांना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरही पाठिंबा देणार आहेत. ते शेट्टी यांच्यासोबत आंदोलनात उतरणार आहेत. त्यांच्याशिवाय बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, माजी खासदार बळीराम जाधव हेही आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मराठवाड्यातही दूध आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे. उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. जालना जिल्ह्यात जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील दूध संकलन केंद्रावर जाणारी गाडी अडवून ते दूध रस्त्यावर ओतले. विदर्भ स्वाभिमानी संघटनेचे नेते देवेंद्र भुयार यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरला जाणार दुधाचा टँकर फोडला आणि पेटवला.
दूध उत्पादकांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी राज्यभर किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या मार्फत नोटिसा बजावण्यात येत आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनाही नोटिसा बजावून पोलिसांनी, किसान सभा व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनाआंदोलन करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ.अजित नवले यांनाही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन नोटीस बजावण्यात आली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर अशाप्रकारे नोटिसा बजावून दडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत आहे. पुण्यात वाकड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर उलटवला.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध आंदोलनातील कार्यकर्त्यांना पोलिस त्रास देत आहेत. वेठीस धरत आहेत. पोलिसांनी माकड़ चेष्टा थांबववी. शेतकरी चिडला तर मग तो कोणाचे एकणार नाही असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर तथाकथित नेते हे दुधउत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत : आंदोलकांच्या कडून, सरकारची बदनामी करून, दुध उत्पादकांना त्रास दिला जात आहे : दूध उत्पादक हे खूप कष्टातून दूध उत्पादन करता, त्यामुळे दुधाची नासाडी करू नका असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे.
COMMENTS