परळी मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीचे भिमराव सातपुते यांचे पारडे जड ?

परळी मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीचे भिमराव सातपुते यांचे पारडे जड ?

बीड – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी वंचित बहूजन आघाडीकडून इच्छुक नेत्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये परळी मतदारसंघासाठी काँग्रेसचे नेते आणि सभापती राजेसाहेब देशमुख तसेच वंचितचे तालुकाध्यक्ष भिमराव सातपुते यांच्यासह एकूण सात नेत्यांनी मुलाखत दिली आहे. परंतु मतदारसंघात सध्या राजेसाहेब देशमुख आणि भिमराव सातपुते यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. वंचितच्या स्थापनेपासून आपण पक्षाचं काम केलं असल्यामुळे वंचितकडून आपल्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचा दावा सातपुते यांच्याकडून केला जात आहे.

दरम्यान भिमराव सातपुते यांचे वंचित बहूजन आघाडीचे महासचिव आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याशी जवळीकतेचे संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सातपुते यांनी वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव यांचा स्वखर्चातून प्रचार केला होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे दुसय्रा पक्षातील नेत्यांना संधी देण्यापेक्षा माझ्या उमेदवारीचा विचार करुन पक्ष मलाच उमेदवारी देईल असा दावा भिमराव सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे वंचित बहूजन आघाडीकडून कडून आता कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS