तब्बल 17 वर्षांच्या विरोधानंतर ‘या’ नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट !

तब्बल 17 वर्षांच्या विरोधानंतर ‘या’ नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई – तब्बल 17 वर्षांच्या विरोधानंतर साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी जाचक यांनी दुपारचे जेवण घेतले. त्यांच्या या भेटीमुळे इंदापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार-जाचक भेट झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी गेल्या काही महिन्यांपासून मनोमिलनासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना आज अखेर यश आले असून पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची भेट घेतली आहे. साखर उद्योगातील अडचणींबाबत आजच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती पृथ्वीराज जाचक यांनी दिली. तर महत्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा किरण गुजर यांनी केला आहे.

पृथ्वीराज जाचक हे सहकार क्षेत्रातील दिग्गज आहोत. परंतु काही वर्षांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून ते दुरावले होते. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात डावलले जात असल्याच्या भावनेतून पृथ्वीराज जाचक यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली होती. ही कटुता इतकी वाढली की, जाचक यांनी त्यावेळी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना थेट आव्हान दिले होते. परंतु ते आता पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात आले असल्याचं दिसत आहे.

COMMENTS