औरंगाबादमध्ये उद्यापासून शेकापचे 17वे अधिवेशन !

औरंगाबादमध्ये उद्यापासून शेकापचे 17वे अधिवेशन !

औरंगाबाद – भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे १७ वे अधिवेशन दि.१ व २ ऑगस्ट २०१८ रोजी भाई उद्धवराव पाटील नगर, कर्णपुरा मैदान, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस मा.खासदार कॉ. सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव,  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  पॉलिट ब्युरो सदस्य डी. राजा, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आहे.  निवडणुकीच्यापूर्वी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याकरिता या अधिवेशनात मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच पुढील राजकीय वाटचालीत पक्षाची भूमिका याठिकाणी ठरवण्यात येणार आहे. अधिवेशनस्थळी दहा हजार कार्यकर्ते येणार असल्याचे सांगितलं जात असून सर्व प्रतिनिधींची राहण्याची व जेवणाची सोय पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठ्या संख्येत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अधिवेशनास यावे असं अवाहन  चिटणीस भाई बाळासाहेब धस यांनी केलं आहे.

COMMENTS