नागपूर – विधानभवनावर दहशतवाद्यांचं सावट ?, राजकीय वर्तुळातील चर्चेनं खळबळ !

नागपूर – विधानभवनावर दहशतवाद्यांचं सावट ?, राजकीय वर्तुळातील चर्चेनं खळबळ !

नागपूर – विधानभवनाला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची जोरदार चर्चेमुळे सध्या नागपुरात खळबळ उडाली असल्याचं दिसत आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानभवन प्रवेश अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या असून, सभापतींच्या या आदेशामुळे विधानभवनाला दहशतवाद्यांचा धोका आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे नागपुरकरांमध्येही खळबळ उडाली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात सोमवारपासून विधानभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था कड करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आमदारांसोबत केवळ एका खासगी सचिवाला प्रवेश पत्र असेल तरच प्रवेश दिला जात आहे.   वैयक्‍तिक शासकीय कामांसाठी येणार्‍या व्यक्‍ती व मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाला विधानभवन प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संबंधितांनी मंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन द्यावे, तसेच मंत्र्यांनी यापुढे आपल्या खात्याच्या बैठका विधानभवनातील दालनात न घेता आपल्या निवासस्थानी घेण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत. एकूणच विधानभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केल्यामुळे विधानभवनाला दहशतवाद्यांचं सावट आहे की काय अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

COMMENTS