मुंबई – माझ्यासह काँग्रेसचे सात आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यानं केला आहे. काँग्रेसमधून निलंबीत झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. वऱ्हाड निघालं लंडनला हे खूप गाजलेलं नाटक होतं, पण आमच्या बाबतीत वऱ्हाड निघालं भाजपकडे असं म्हणावं लागेल, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. तसेच मी एकटाच नाही तर माझ्यासह काँग्रेसचे 7 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. सत्तार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या सोबत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये बंड पुकारले होते. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नाहीतर त्यांनी सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही भेट त्यांनी घेतली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आता विधानसभेच्या तोंडावर सत्तार यांनी आता भाजपची वाट निवडली आहे. आज सत्तार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच काँग्रेसचे हे सात आमदार कोण आहेत. याबाबत तर्कवितर्क लावे जात आहेत.
COMMENTS