सेक्स हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार, हार्दिक पटेलच्या मदतीला आला “हा” नेता !

सेक्स हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार, हार्दिक पटेलच्या मदतीला आला “हा” नेता !

अहमदाबाद – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्लिल सीडीचं जोरदार राजकारण सुरू आहे. पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांची काल सलग दुस-या दिवशी दुसरी सीडी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. तो त्याचे दोन सहकारी एका मुलीसोबत ड्रिंक करत असल्याचं दुस-या सीडीमध्ये दिसत आहे. परवा हार्दिकची पहिली सीडी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

या प्ररणावरुन राजकारण चांगलंच तापलंय. आपल्याला बदनाम करण्याचं भाजपचं हे षडयंत्र असल्याचं उत्तर हार्दिक पटेलनं या प्रकरणावर दिलं आहे. हा पाटीदारांचा आणि महिलांचा अपमान असल्याचंही हार्दिकनं म्हटलं आहे. काँग्रेसनंही हार्दिकची बाजू घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता दलित नेता जिग्नेश मेवानी यांनीही हार्दिक पटेलला पाठिंबा दिला आहे. ट्विट करुन त्यांनी हार्दिकला पाठिंबा दिला आहे. हार्दिक तू घाबरु नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे. सेक्स हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. असंही जिग्नेश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटंल आहे.

जिग्नेश यांच्या या ट्विटनंतर ट्रोलरनी त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यालाही जिग्नेश यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ‘मित्रांनो, माझी सीडी कधी येणार हे विचारणारे मेसेज फेसबुकच्या इन बॉक्सवर पाठवू नका. सीडी येईल, तेव्हा जरूर पहा,’ असा टोला त्यानं ट्रोलर्सना हाणला आहे.

 

Dear Hardik Patel, don’t worry. I m with you. And right to sex is a fundamental right. No one has right to breach your privacy.

COMMENTS