शहला रशीद आणि कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढवणार ?

शहला रशीद आणि कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली – जेएनयूचे विद्यार्थी शहला रशीद आणि कन्हैया कुमार हे दोघही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार संकेत दिले आहेत. या दोघही कायमच भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला विरोध करत आले आहेत. कन्हैया कुमार हा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता असून शहला रशीद ही जेएनयूतील पीएचडीची विद्यार्थीनी आहे. तसेच ती ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची उपाध्यक्ष होती. २०१६ मध्ये जेएनयूत मोदी सरकारविरोधातील आंदोलन केल्यामुळे हे दोघंही चर्चेत आले होते.

दरम्यान आगामी निवडणुकीसाठी भाजपाविरोधात सामाजिक-राजकीय तसेच पुरोगामी विचारांच्या संघटनांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचं या दोघांनीही म्हटलं आहे. तसेच आपण यामध्ये विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच बिहारमध्ये राजद-काँग्रेस-डावे यांची युती असती आणि त्यांनी मला त्यांचा सर्वसाधारण उमेदवार निवडले तर मी तयार असेन असं कन्हैया कुमारनं म्हटलं आहे. त्याचं कारण म्हणजे माझा संघटित राजकारणावर विश्वास आहे. मला जर कुठली निवडणूक लढवावी वाटली तर मी ती मुख्य प्रवाहातील पक्षाकडून लढवणार असल्याचंही कन्हैयानं म्हटले आहे.

 

COMMENTS