नुकतेच शिवसेनेत गेलेल्या आमदार बरोरांविरोधात राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने थोपटले दंड!

नुकतेच शिवसेनेत गेलेल्या आमदार बरोरांविरोधात राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने थोपटले दंड!

शहापूर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. परंतु पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेल्यामुळे आता त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी दंड थोपटले आहेत. जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली, तर मी स्वत: त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी अर्ज दाखल करेन असे भास्कर बरोरा यांनी सांगितले आहे.” यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूरमध्ये भावा विरुद्ध भाऊ अशी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शहापुर राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी काल (9 जुलै) आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. परंतु आमदार पांडुरंग बरोरा यांचे सख्खे चुलत भाऊ भास्कर बरोरा यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तसेच जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली तर मी राष्ट्रवादीतून त्यांच्या विरोधात उमेदवारीसाठी अर्ज करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.त्यामुळे शहापूरमध्ये आता बरोरा विरुद्ध बरोरा असा सामना रंगणार आहे.

COMMENTS