मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, बैठकीला येण्यास शाहू महाराजांचा नकार !

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, बैठकीला येण्यास शाहू महाराजांचा नकार !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन बैठक बोलावली आहे. या बैठकीला त्यांनी मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण पाठवलं आहे. परंतु या बैठकीला येण्यास श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी नकार दिला आहे. या बैठकीला मराठा समाजातील ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायाधीश, सनदी अधिकारी उपस्थित असून सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु आहे.

दरम्यान 58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान सह्याद्रीवर सुरु असलेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS