मराठा आरक्षणावरून शिवसेना आमदार शंभूराज देसाईंचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

मराठा आरक्षणावरून शिवसेना आमदार शंभूराज देसाईंचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

मुंबई – मराठा आरक्षणावरून शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांबरोबर सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक आयोजित करण्याची मागणी शंभूराज देसाई यांनी या पत्रात केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आम्ही विधानसभेत आणि बाहेरही वारंवार मांडली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक आयोजित करण्यात यावी अंस शंभूराज देसाई यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान शांत असलेल्या मराठा मोर्चांना आता हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक बोलवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यभर सुरू असलेले हिंसक आंदोलन थांबवण्यासाठी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी ही बैठक घेणं गरजेचं असल्यांचही शंभूराज देसाई यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या पत्राला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS