राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विभागाचा आढावा !

राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विभागाचा आढावा !

मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानभवन येथे विभागाची आढावा बैठक घेतली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यव्यूहरचना जाणून घेतली. यामध्ये मद्यावरील उत्पादन शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क, दंड व विशेषाधिकार आयुक्त कार्यालय संरचना, क्षेत्रीय संरचना, प्रशासकीय विभाग, दारूबंदी कायद्याची नियमावली, मद्य घाऊक विक्री, किरकोळ विक्री, मद्यनिर्मिती, उत्पादन शुल्क आकारण्याची पध्दत, सध्या अस्तित्वात असलेले दर व एमआरपीचे कोष्टक, याबाबत श्री. देसाई यांनी विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना केली. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री श्री. देसाई यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विभागातील रिक्त पदांबाबतही त्यांनी माहिती घेतली.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे वर्मा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS