बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यावर आहेत. यादरम्यान शरद पवार यांनी अनेक गावात जावून दुष्काळाची पाहणी केली. तसेच शेतक-यांशी संवादही साधला. यावेळी पवार यांनी आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची भेट घेतली. शरद साबळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. यावेळी या कुटुंबाच्या व्यथा जाणून घेत पवार यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील शरद साबळे या कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातच गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. @PawarSpeaks साहेब यांच्यासमवेत आज आत्महत्याग्रस्त साबळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. @NCPspeaks pic.twitter.com/yH2RezwwLW
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 13, 2019
दरम्यान यावेळी साबळे कुटुंबाने कर्ज कसे फेडायचे अशी चिंता व्यक्त केली. त्यावेळी कर्ज फेडू नका आम्ही पाहून घेतो, असा धीर शरद पवारांनी दिला. आम्ही तुमच्यासोबत आहोत काही काळजी करु नका असंही यावेळी पवार या कुटुंबाला म्हणाले. यावेळी या कटुंबानं पवार यांचे आभार मानले.
COMMENTS