मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा होती. परंतु असं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादीमधून अजित पवारांची हकालपट्टी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी अजित पवारांवर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून ही हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच 12.30 वाजता होणार्या पत्रकार परिषदेत शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं असून आम्ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS