बारामती – कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर व नेदरलँडचे कृषीमंत्री ॲल्ड्रीक खिअरवेल्ड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुरी कृषी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणा-या बारामती अग्रीकल्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकावणा-या सर्वच मुली होत्या.
प्रथम क्रमांक मिळवणा-या सर्व मुलीच कशा असा प्रश्न यावेळी अजित पवारा यांनी केला ? तोच धागा पकडत शरद पवार यांनी ग्रामिण भागातील तरुणांना कानपिचक्या दिल्या… कृषीक्षेत्रात कामगिरी करणाऱ्या सर्व मुलीच आहेत मुलं काय करतात, तर मुलं निवडणूकीला उभी राहतात .. कुणाला सहकारी संस्थेचे संचालक व्हायचंय ,कुणाला पंचायत समितीत सदस्य तर कुणाला साखर कारखान्यात संचालक व्हायचंय, कुणाला जिल्हा परिषदेच सदस्य व्हायचंय. त्यामुळे मुलांना अभ्यास आणि शेतीकडे बघायला वेळच नाही असं सांगत युवकांना खडे बोल सुनावले. शरद पवार काय म्हणाले ऐकूया त्यांच्याच शब्दात….. क्लिक करा खालील लिंकवर
COMMENTS