मातोश्रीनंतर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन!

मातोश्रीनंतर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धमकीचा फोन आला होता. त्यानंतर वर्षावरही धमकीचा फोन आला होता. आता मातोश्रीप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला असल्याची माहिती आहे.शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती आहे.

तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले आहेत. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्था मातोश्रीला बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. त्यानंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आला होता. फोन कोणी केला होता याबाबत तपास सुरु आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

COMMENTS