विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत शरद पवार करणार मोठे फेरबदल !

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत शरद पवार करणार मोठे फेरबदल !

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षात मोठे फेरबदल करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. विधानसभेत जास्तीत जास्त तरुणांना तिकीट देण्यात येणार असून याबाबत स्वतः शरद पवार लक्ष घालणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणा कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केली, परंतु तरी 48 जागांचा विचार करता राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत केवळ 4 जागा मिळाल्या. त्यामध्ये रायगड, बारामती, सातारा, शिरुर या चारच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी तरुण नेतृत्वाला संधी दिली देण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत मोठी फेररचना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS