असा असणार शरद पवार यांचा राज्यभर दौरा !

असा असणार शरद पवार यांचा राज्यभर दौरा !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादी पक्षाला गळती लागली आहे. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी आता स्वत: शरद पवार मैदानात उतरणार आहेत. पुढच्या आठवड्यात पवार हे राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाला बळ देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. 17 सप्टेंबर पासून पवार दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला चितपट करून लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. मात्र सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी अडचणीत सापली आहे. परंतु तरीही आघाडीला बळ देण्यासाठी आता पवारांनी स्वत: मोर्चोबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचीच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लावण्यासाठीही आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत.

COMMENTS