शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक !

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक
बोलावली आहे. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होण्याची शक्यता असून ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे, त्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 20 ऑगस्टला ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत. पवार यांनी अनेकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि देशाचं कृषीमंत्रिपद भूषवलं असल्यामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांचं पुनर्वसन करताना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याबाबत ते निवेदनातून माहिती देणार आहेत. या भेटीदरम्यान शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS