मुंबई – काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सुचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा.असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला केले.
दरम्यान काँग्रेस या देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता 100 खासदार ही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. राहुल गांधी ही काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार नाहीत त्यामुळे काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी मूळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपवावे अशी माझी सूचना असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विसर्जन करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
COMMENTS