मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात एका फेसबूक पेजवरुन अत्यंत वादग्रस्त पोस्ट करण्यात आली आहे. ‘राष्ट्रहितासाठी शरद पवार यांची हत्या केली तर पाप लागणार नाही.’ अशा आशयाची पोस्ट फेसबूकवर व्हायरल झाली आहे. त्याविरोधात आता राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात पोलिसांना पत्र लिहिलं आहे.
तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही या प्रकरणी राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे चालवण्यात येणा-या फेसबूकपेजवर अशा प्रकरारचे लिखाण केल्याचा दावाही सुनिल तटकरे यांनी केला आहे.
COMMENTS