अबब… म्हणे शेतमालाला योग्य भाव दिल्याने शेतक-यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले !

अबब… म्हणे शेतमालाला योग्य भाव दिल्याने शेतक-यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले !

यवतमाळ – कर्जमाफीच्या नावाने सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असताना राज्य सरकारने अजब दावा केला आहे. त्याबाबतचं पत्रकच आज शरद पवार यांनी विदर्भ दौ-यात पत्रकारांना दाखवलं.  सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमध्ये 70 लाख शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांचा दावा केला आहे. एवढचं नाहीतर यामुळे शेतमालाला चांगला भाव दिल्यामुळे  शेतक-याचं उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले आहे असं छापल्याचंही पवार यांनी सांगितलं. राज्यकर्त्यांनी इतके मोठे असत्य वक्तव्य करू नये, यामुळे शेतकरी नैराश्यात जाऊ शकतो असा इशारा पवार यांनी दिला.

शेवगाव येथे काल शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाल्याचे कळले. भाववाढीसाठी शेतकरी अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण अशावेळी त्यांच्यावर बळाचा वापर टाळला पाहिजे असंही पवार म्हणाले.

COMMENTS