त्यामुळे आता माझ्या बोटाची चिंता वाटते – शरद पवार

त्यामुळे आता माझ्या बोटाची चिंता वाटते – शरद पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेत असून मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. राजकारणात वैयक्तिक टीका करायची नाही असा नियम आहे. दिल्लीत मला भेटतील तेव्हा मोदींना मी यासंबंधी विचारणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सभेत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.

दरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार यांचा हात पकडून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा धागा पकडत शरद पवार यांनी ‘बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आता मला या वाक्याची भीती वाटते. पंतप्रधान संसदेत भेटतात तेव्हा ते हात पुढे करतात. पण माझ्या करंगळीचे काय होईल, या भीतीने हातात हात देण्याऐवजी कोणाशी ही हात मिळवत नाही. त्यामुळे आता माझ्या बोटाची चिंता वाटते. आता थेट हात जोडून नमस्कार करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS