पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर कार्यक्रमात तंबी दिली आहे. इंदापूर बाजार समितीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या परंतु भरणे यांनी आपल्या भाषणात केवळ बंधूंनो, बंधूंनो असाच उल्लेख केला. त्यामुळे शरद पवार यांनी भरणे यांना जाहीरपणे तंबी दिली आहे.
या कार्यक्रमाला 90 टक्के महिला उपस्थित आहेत परंतु तुम्ही भाषणात केवळ बंधूंनो.. बंधूनो.. म्हणून महिलांकडे दुर्लक्ष करत असाल, तर येणाऱ्या निवडणुकीत काय होईल ते पाहा, असा इशाराच शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना दिला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार नारायण पाटील उपस्थित होते.
COMMENTS