अर्धनग्न अवस्थेत मंचावर आला तरुण शेतकरी, शरद पवारांना म्हणाला… VIDEO

अर्धनग्न अवस्थेत मंचावर आला तरुण शेतकरी, शरद पवारांना म्हणाला… VIDEO

नाशिक – येवला याठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी नगरसुल येथील कृष्णा डोंगरे या तरुण शेतकय्रानं मोदी सरकारविरोधात मंचावर अर्धनग्न अवस्थेत येऊन शरद पवार यांना निवेदन दिले. तसेच भाजप सरकारच्या काळात माझ्यावर खूप अन्याय झाला असल्याची व्यथा त्याने मांडली. यावेळी पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात 12 कोटी शेतकरी आहेत,त्यातील 25 टक्के थकबाकीदार आहेत. त्यांना दिलासा देण्याचं काम आम्ही केलं. शून्य टक्के व्याजाने अनेक बँक शेतकऱ्यांना कर्ज देते. आता शेती अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मोदीला घालवणार तेव्हाच थांबणार असल्याचंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कांद्याची निर्यात वाढवून कांद्याला भाव दिला तर भाजपच्या खासदारांनी सभागृह बंद पाडले. कधी नव्हे शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर आंदोलन करतात.मोदी नाशिकमध्ये आले मात्र कांदा, शेतकरी यांच्याबाबत काही बोलले नाही. खाणाऱ्याला जगवायचे असेल तर पिकवणाय्राला जगवावे लागेल. मोदींच्या सभेच्या ठिकाणी खंदक केले, आलेल्या प्रत्येकाची झडती घेतली
शेतकरी कांदा फेकू नये म्हणून झडती घेत होते. व्हीआयपींच्यी सुरक्षा व्यवस्थेसाठी बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले. जास्तीत जास्त 2 हजार ट्रॅक्टर येतात जे रस्त्यात आले.ट त्यांचा खर्च मोदी देणार का असा सवालही यावेळी पवारांनी केला आहे.

तसेच शेतकऱ्यांचं नुकसान नाकरून सुरक्षा देणाऱ्या सरकारला शेतकय्रांची आस्था नाही. काळा पैसा संपला नाही, नोटाबंदीनंतर रोख व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला. चेकच्या व्यवहाराचा विरोधक नाही मात्र सर्वत्र चेकचा व्यवहार नसतो असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS