अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी आज पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गुन्हे दाखल करा नाहीतर अटक करा, पण शेतकरी, कामगार, युवक यांच्या प्रश्नांवर आपण बोलत राहू, हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत आहे. परंतु आम्ही कशाला घाबरत नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजप आणि सेनेला शेतीतले काही कळत नाही. कांद्याची वाईट अवस्था आहे. सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना सरकारने निर्यात बंदी केली हे सरकारचे शेतकाऱ्यांवरील प्रेम आहे का असा सवाल पवारांनी यावेळी केला. तसेच महाराष्ट्रात कुणाचेही कर्ज माफ झाले नाही, आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी दिली होती. या वर्षी 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योगाचे आणि शेतकऱ्याचे नुकसान केले असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS