मला आजवर पुणे महापालिकेचे राजकारण उमगलेले नाही – शरद पवार

मला आजवर पुणे महापालिकेचे राजकारण उमगलेले नाही – शरद पवार

पुणे – माझा अनेक महापालिकांशी संबंध आला, परंतु मला आजवर पुणे महापालिकेचे राजकारण उमगलेले नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पुणे महापालिकेला मोठी परंपरा आहे. तुमची माणसे म्हणून वावरणारे महापालिकेची निवडणूक जाहीर होताच रंग बदलतात,असही पवारांनी म्हटलं आहे. माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते.

दरम्यान एक वेळ तुम्ही आमदार-खासदारकीचे, अगदी मुख्यमंत्री पदासाठी त्या पातळीवरचे राजकारण करू शकता. परंतु, महापालिकेचा आणि तेही पुणे पालिकेच्या राजकारणाचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही असही पवारांनी म्हटलं आहे. तसेच सलग ३८ वर्षे नगरसेवक म्हणून निवडून येणे सहज सोपे नाही.

महापौर झाल्यानंतरही उल्हास ढोले पाटील यांनी सर्वसामान्यांशी असलेली त्यांची बांधिलकी जपत आदर्श प्रस्थापित केला. उल्हासराव हे एकमेव असे महापौर असतील, की पद मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या मूळ व्यवसायाशी प्रतारणा न करता घरोघरी जाऊन दूध वाटण्याचे काम सुरूच ठेवले असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS