पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ब्रिटीश आणि मुघलांची सत्ता घालवा असं आवाहन पवारांनी जनतेला केलं आहे. मोदींनी फक्त फसव्या घोषणा दिल्या असून आश्वसनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे जनतेने अनेक मोठमोठ्या राजवटी उलथून टाकल्या आहेत, हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशाराही पवारांनी दिला आहे. ते सासवडमधील राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान आजचे पंतप्रधान परदेशात जाऊन पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींना शिव्या घालतात हे देश हिताचे नाही. तसेच पंतप्रधान असो वा लोकप्रतिनीधी तो पक्षाचा नसतो, देशाचा असतो राष्ट्राचा विचार करायचा असतो. देशात दबावाचे राजकारण सुरू असून मुघल, इंग्रज, यांची सत्ता देशाने उलथवली आहे.
सीबीआय, न्यायालय, रिझर्व्ह बँक यांच्यावर पंतप्रधानाकडून आघात होत असेल तर देश कसा टिकणार? असा सवालही यावेळी पवारांनी केला आहे. नोटबंदीने सर्वसामान्य उध्वस्त झाला, अर्थव्यवस्था उध्वस्त झाली, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतकरी व्यवसाय उध्वस्त झाले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
तसेच मोदींचा देशाने प्रधानमंत्री म्हणून सन्मान केला, सन्मानाला पात्र नाही म्हणून टीका झाली तर ते म्हणतात चहा वाल्याला संपवायला निघालेत. कोण संपवायला निघाले नाही, जनताच बाजूला करणार आहे.मोदींना भाजपने पर्याय म्हणून पुढे केले असेल पण देशाला पर्याय ते ठरू शकत नाहीत.
10 टक्के सवर्णांना आरक्षण निर्णय घेतलाय. यात स्पर्धा परीक्षा होणार आहे. पास होणाराच पात्र होणार आहे, फसवी घोषणा आहे. हा ही एक चुनावी जुमला असून तरुणांना ही फसवण्यात आले आहे, मात्र ही तरुण पिढी पेटून उठली तर देश पेटून उठेल. असा इशाराही यावेळी शरद पवार यांनी दिला आहे.
COMMENTS