बारामती – बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री या योजनेअंतर्गत कृत्रिम उपकरणांचं वाटप करण्यात आलं. यावेळी या ज्येष्ठ नागरिकांनी शरद पवार यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्तुती ऐकताच पवार यांनी डोक्याला हात लावला तसेच लाभार्थींचे मनोगत थांबवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे या कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर हे उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री. कृष्णपाल गुर्जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याचा आनंद आहे. आज ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील समस्या दूर होण्यासाठी काही साहित्याचे वाटप करण्यात आले. खा. @supriya_sule यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. pic.twitter.com/xGVYxY6idN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 24, 2018
दरम्यान केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदार संघातील साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंर्गत कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत उपकरणांचे वाटप करण्यात आले.त्यावेळी लाभार्थ्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी या कार्यक्रमात देण्यात आली. परंतु या लाभार्थ्यांनी योजनेबाबत न बोलता थेट शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली . त्यामुळे ही स्तुती ऐकूण पवार यांनी डोक्याला हात लावून या लाभार्थ्यांचे मनोगत थांबवण्याची सूचना केली.
COMMENTS