मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची नियोजित मुलाखत रद्द करण्यात आली आहे. पुणे येथे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान मार्फत 28 आणि 29 डिसेंबर रोजी आयोजित १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार होती. शिवसेना खासदार संजय राऊत हे मुलाखत घेणार होते. परंतु
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान साहित्यिक कलावंत संमेलनातील उर्वरित सर्व कार्यक्रम नियोजित वेळेतच होणार आहेत. परंतु शरद पवार यांची मुलाखत येत्या काही दिवसातच आयोजित करण्यात येईल अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा. पिंगळे यांनी दिली आहे. येत्या काही दिवसांतच ही मुलाखत आयोजित करण्यात येईल. त्यामुळे लवकरच जाहीर व्यासपीठावर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील प्रश्नोत्तराची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
COMMENTS