मी आघाडी सरकारचा हेड मास्टर नाही – शरद पवार

मी आघाडी सरकारचा हेड मास्टर नाही – शरद पवार

मुंबई – मी आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही. जिथं लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतं असं रोखठोक मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवार यांनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान या मुलाखतीत तुम्ही आघाडी सरकारचे हेड मास्टर आहात की रिमोट कंट्रोल असा प्रश्न राऊत यांनी विचारला यावर बोलताना मी आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही असं पवार म्हणाले आहेत.

पवार यांनी या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या सर्व आरोपांना देखील उत्तरं दिली. सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहित नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत साधारणपणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून करोनाचा आलेख खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येणार असली तरी करोना पूर्णपणे संपला असं समजण्याचं कारण नाही असंही म्हटलं आहे. करोना हा दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे हे मान्य करुनच आपण पुढील वाटचाल केली पाहिजे असंही पवार म्हणाले आहेत.

COMMENTS