शरद पवारांच्या मुलाखतीतील प्रश्नोत्तरे, वाचा सविस्तर !

शरद पवारांच्या मुलाखतीतील प्रश्नोत्तरे, वाचा सविस्तर !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दिला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवार यांची मुलाखत घेत आहेत. पुण्यात बीएमसची कॉलेजमध्ये या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं असून या मुलाखतीला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे आणि  शरद पवार यांच्यामधील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे ….

राज ठाकरे – शेतकरी की उद्योगपती ?

शरद पवार – शेतकरी

राज ठाकरे – अमराठी उद्योगपती की मराठी ?

शरद पवार – उद्योगपती

राज ठाकरे – दिल्ली की महाराष्ट्र ?

शरद पवार – दिल्ली

राज ठाकरे – काँग्रेस की भाजप?

शरद पवार – काँग्रेस

राज ठाकरे – राज की उद्धव ?

शरद पवार – ठाकरे कुटुंबीय

राज ठाकरे – आजवर आपल्यावर अनेकप्रकारचे आरोप झाले त्याचं तुम्ही स्पष्टीकरण देत नाहीत. त्यामुळे अनेकांच्या मनात त्या तशाच वाटतात?

शरद पवार – तथ्य नसणा-या आरोपांकडे लक्ष देत नाही.

राज ठाकरे –  यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी कोण योग्य वाटतं ?

शरद पवार – इंदिरा गांधी आणि यशंवतराव चव्हाण दोघंही योग्यच होते. मी दोघांनाही मानतो.

राज ठाकरे – नरेंद्र मोदींबद्दल पहिलं आणि आताचं मत काय ?

शरद पवार – पंतप्रधान मोदी हे कष्टाळू व्यक्तीमत्व, गुजरातला त्यांच्यामुळे मोठा फायदा, राज्य चालवणं शक्य आहे पण देश चालवणं खूप अवघड, देश चालवण्यासाठी टीम महत्त्वाची, मोदींच्या मंत्रिमंडळात टीमचा अभाव.

राज ठाकरे – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु केली जात आहे. तिचा महाराष्ट्राला काय फायदा ? मुंबई स्वतंत्र करण्याचं हे षडयंत्र आहे का ?

शरद पवार – बुलेट ट्रेन करायची असेल तर दिल्ली-मुंबई अशी करा, त्यामुळे मुंबईची गर्दी वाढणार असून तिकडचे इकडे येणार. याला आमचा विरोध. कारण नसताना बुलेट ट्रेन सुरु केली. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडूच शकत नाही.

राज ठाकरे – विदर्भाचे अनेक मुख्यमंत्री झाले मग वेगळ्या विदर्भाची मागणी का होते ?

शरद पवार – विदर्भ, मराठवाडा, आणि इतर विभागातील लोकांमध्ये वेगळी धारणा, विदर्भात दोन भाग, चार जिल्ह्यांचीच वेगळ्या विदर्भाची मागणी, ते जिल्हे हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे मागणी वाढत आहे.

राज ठाकरे – शेतकरी आत्महत्या करतो. हे प्रमाण पंधरा वर्षात वाढलं हे कधी थांबणार ?

शरद पवार – यवतमाळमधील शेतकरी कुटुंबानं कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर आम्ही कर्जमाफी केली. शेतक-यांना भांडवल पुरवलं पाहीजे. आत्महत्या हा पर्याय नाही.

राज ठाकरे – खाजगीकरण मोठ्याप्रमाणत होत आहे. त्यामुळे तरुणांना नोक-या मिळत नाहीत त्यामुळे आरक्षण कोणाला दिलं पाहिजे ?

शरद पवार – आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-यांनाच आरक्षण दिलं पाहिजे.

राज ठाकरे – शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जाती जातींमध्ये कडवटपणा आला आहे तो दूर करण्यासाठी काय केलं पाहीजे?

शरद पवार – कोणत्याही व्यक्तीकडे जात म्हणून बघू नका, त्याचं कर्तूत्व बघितलं पाहिजे. बाळासाहेबांनी कधी जात धर्म मानला नाही. जातीवाचक संघटनांमुळे हे घडत आहे. त्यांना काहींकडून प्रोत्साहन दिलं जात आहे.

राज ठाकरे – महाराष्ट्रातील लोकं कोणाचं नाव पाहून एकत्र येतील ?

शरद पवार – छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घेऊन राज्यातील सर्व लोकं एकत्र येतात. आणि येऊ शकतात.

राज ठाकरे – खरं बोलण्याचा कधी त्रास झाला का?

शरद पवार – राजकारणात खरं बोलावसं वाटतं पण जिथं बोलणं अडचणीचं असतं तिथे बोलत नाही. असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे.

राज ठाकरे – पक्षातून आतबाहेर पढताना काय विचार होते ?

शरद पवार – मतभेदांमुळे काँग्रेस सोडावी लागली, सुशिलकुमार शिंदे यांनीही काँग्रेस सोडली होती. परंतु त्यांनी कधी काँग्रेसची विट सोडली नाही.

राज ठाकरे – 1992-93 मध्ये दंगल झाली, त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालात. त्यावेळी नरसिंहराव आणि तुमच्यामध्ये काय झालं

शरद पवार – जगाचं लक्ष मुंबईकडे असतं. त्यामुळे मुंबई पेटली ही जगासाठी चिंतेची गोष्ट होती. त्यामुळे नरसिंहरावांनी मला महाराष्ट्रात पाठवलं, त्यावेळी माझा विरोध होता.

 

COMMENTS